नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या दोन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. याप्रकरणी मुंबईनाका, उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला बलात्काराचा प्रकार वडनेर दुमला ता.जि.नाशिक येथे घडला. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. रोशन संपत बुटे (रा.राजपूत कॉलनी,वडनेर दुमाला) याने शेजारी राहणा-या एका अल्पवयीन मुलीचा अज्ञानपणाचा फायदा उचलत तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. अचानक पोटात दुखू लागल्याने कुटुंबियांनी तिला रूग्णालयात दाखल केले असता ती संशयितापासून गर्भवती राहिल्याचे समोर आले. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.
दुसरा प्रकार मुंबईनाका पोलीस ठाणे हद्दीत घटना घडली. येथे राहणा-या शाळकरी मुलीस रोहित गणपत कडाळे (२० रा.शिवाजीवाडी वडाळापाथर्डी रोड) या युवकाने पांडवलेणी भागातील तिथली गार्डन भागात घेवून जात वेळोवेळी बलात्कार केला. फेब्रुवारी २०२३ पासून हा प्रकार सुरू होता. रविवार कारंजा येथील शाळा परिसरातून तो दुचाकीवर मुलीस तिथली गार्डन येथे घेवून जात होता. यातून मुलगी गर्भवती राहिली. तिने स्त्री जातीच्या बाळास जन्म दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, हा गुन्हा मुंबईनाका पोलीसांनी इंदिरानगर पोलीसांकडे वर्ग केला आहे.