नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वेगवेगळया भागात पार्क केलेल्या पाच दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,आडगाव,गंगापूर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना पारिजातनगर भागात घडली. राजनारायण बटूकदेव (रा.सायकल सर्कल जवळ,पारिजातनगर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बटूकदेव यांची पल्सर एमच १५ जेजी ८२०३ गेल्या २८ मार्च रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी गंगापूर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.
दुसरी घटना इंदिरानगर भागात घडली. बबन निवृत्ती वर्पे (रा.द्रोनाचार्य बिल्डींग,पांडवनगरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वर्पे यांची एमएच १५ एचएच ४५७२ मोटारसायकल १५ मार्च रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. तिस-या घटनेत याच भागातील मनिष सुभाष पवार (रा.चार्वाक चौक) यांची स्प्लेंडर एमएच १५ एपी ६८६७ मोटारसायकल २० मार्च रोजी स्टेट बँक कॉलनीतील स्वामी बंगल्यासमोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार खरोटे व पारणकर करीत आहेत.
चौथ्या घटनेत पेठरोडवरील मेहरधाम भागात राहणारे संजय राधाकृष्ण पवार हे गेल्या २९ मार्च रोजी मार्केट यार्ड भागात गेले होते. सुयोग हॉस्पिटल भागातील सिध्दकला प्रिंटीग प्रेस समोर पार्क केलेली त्यांची एमएच १५ बीवाय ८०२७ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत. पाचवी घटना आडगाव मेडिकल कॉलेज येथे घडली. याबाबत भागवत गोपाळराव शिंदे (रा.मोहाडी ता.दिंडोरी) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे २६ मार्च रोजी आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे गेले होते. हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची एमएच १५ बीएल ८०८४ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.