नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार संजय सिहं यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. ४ ऑक्टोंबरला त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आहे. ईडीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर एकीकडे राजकारण तापलेले असतांना आज सर्वोच्च न्यायालयाने आपला दिलासा दिला आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी हा जामीन मंजूर केल्यामुळे आपमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक केल्यानंतर आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिहं यांना ईडीने अटक केली होती. या अटकेनंतर राजकारण चांगलेच तापले होते. दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये मिळालेले यश पाहता आम आदमी पार्टीने राष्ट्रीय राजकारणात येण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे आपला रोखण्यासाठी त्यांच्या पक्षातील प्रमुख नेत्यावर कारवाई संकट ओढवले होते. याचा थेट परिणाम आपवर झाला. त्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांहून अधिक जणांना अटक करण्यात आली.
खा. संजय सिंह हे अटकेत असतांना ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले होते. आता त्यांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा आपच्या कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे.