नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं १९४७ पासून यावर्षी पहिल्यांदाच काश्मीरच्या शारदा मंदिरात होत असलेल्या नवरात्रीच्या पूजेला फार मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे. एक्स मंचावरील संदेशात ते म्हणाले की यावर्षीच्या सुरवातीला या मंदिरात चैत्र नवरात्राची पूजा झाली आणि आता येथे शारदीय नवरात्र पूजेचे मंत्र निनादत आहेत.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की जीर्णोद्धारानंतर २३ मार्च २०२३ रोजी हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्याचे भाग्य मला मिळाले. काश्मीरच्या खोऱ्यात शांतता प्रस्थापित होत आहे याचीच ही सुचिन्हे आहेत असे नव्हे तर त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ज्योत पुन्हा एकदा उजळून निघण्याची सुरुवात झाली आहे याचे निदर्शक देखील आहे.