इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अमिताभ बच्चन सोशल मीडियार नेहमी सक्रीय असतात. त्यात ते नेहमी व्हिडिओ व फोटो पोस्ट करतात. त्यांचा सोशल मीडियावरही मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोवरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असतात. आताही अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट टाकली असून ती थोडी थरकाप उडवणारी अशीच आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी एक डोंगरावरुन उडी मारल्याची पोस्ट टाकली आहे. विशेष म्हणजे त्याचा फोटो टाकत त्यांनी त्यावर त्या फोटोबद्दल माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ॲक्शन सीक्वेन्ससाठी ३० फूट उंच खडकावरून टेकऑफ.. हार्नेस नाही, फेस रिप्लेसमेंट नाही, व्हीएफएक्स नाही.. आणि लँडिंग.. एरर.. गाद्यांवर.. जर तुम्ही भाग्यवान असाल तर..”ते दिवस होते माझे मित्र”
खरं तर आता अॅक्शन सीन करतांना चित्रपटात अनेक नवीन तंत्र आले आहे. त्यामुळे रिस्कही कमी झाली आहे. पण, पूर्वी असे तंत्रज्ञान विकसीत नव्हते. त्यामुळे रिस्क घेऊनच शुटींग केले जात होती. कुली चित्रपटात तर अभिताभचा लागलेले सर्वांना माहित आहे. पण, त्यानंतरही अमिताभ यांचे अॅक्शन सीन काही बंद झाले नाही. त्यांनी हा जुना फोटो शेअर करत आठवणींना उजाळा देण्याबरोबरच ते दिवस होते सांगीतले आहे.
https://www.instagram.com/p/C5MNmEOhUQO/?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=MzRlODBiNWFlZA==
https://www.instagram.com/p/C5MNmEOhUQO/?utm_source=ig_web_button_share_sheet&igsh=MzRlODBiNWFlZA==