नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सातपूर भागातील कामगार नगर परिसरात एका हॉटेलमध्ये कामगारांची अज्ञातांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. महेंद्र सिंग असे हत्या झालेल्या कामगारांचे नाव आहे. तो मूळचा नेपाळचा असल्याची माहिती समोर आली आहे.
कामगार नगर परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. १९ वर्षीय असलेला महेंद्रवर तिक्ष्य हत्याराने वार करण्यात आले. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटने नंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. हत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेचा सातपूर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.