नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन विवाहीतेचा सासरच्या मंडळीकडून छळ होत आहे. याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून त्यातील एकीचा नातेवाईकाने विनयभंग केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाथर्डी फाटा भागात राहणा-या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह ज्ञानेश्वर नगर येथे राहणा-या सासरच्या पाच जणांविरूध्द मानसिक व शारिरीक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी माहेरून पैसे आणले नाही तसेच लग्न व्यवस्थीत लावून दिले नाही या कारणातून महिलेचा छळ केला. तसेच शनिवारी (दि.३०) याच कारणातून मारहाण करीत महिलेचे स्त्रीधन काढून घेत तिचे डोके कपाटावर आदळल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.
दुसरी घटना जेलरोड भागातली सदगुरूनगर परिसरात घडली. पीडितेस मुलगा होत नाही याकारणातून सन.२०१० पासून सासरच्या आठ जणांकडून शारिरीक व मानसिक छळ होत आहे. त्यातील तेजस उर्फ दादू गायकवाड याने फिर्यादीसह तिच्या मुलीचा विनयभंग केल्याने विवाहीतेने पोलीसात धाव घेतली असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोरडे करीत आहेत.