नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डावखरवाडीत येथे किरकोळ कारणाच्या वादातून शेजा-यांनी एका कुटूंबियातील चौघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत महिलेसह पती,जेठ व तिची नणंद जखमी झाली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेखा पोतीवाल,काजल पोतीवाल,गुरूमीत रिपीयाल व लकी रिपीयाल अशी कुटूंबियास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत शालिनी विवेक गायकवाड (रा.माधव लॉन्स, डावखरवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांच्याशी संशयितांचा वाद झाला.
या वादाचा राग मनात धरून संशयितांनी गुरूवारी (दि.२८) महिलेचे घर गाठून गायकवाड कुटूंबियास बेदम मारहाण केली. या घटनेत पीडित महिलेसह तिचा पती,जेठ आणि नणंद जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.