नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवारी गर्दीची संधी साधत भामट्यांनी बसमध्ये चढणा-या दोन महिलांच्या पर्स मधून सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड बसस्थानक परिसरात या दोन चोरीच्या घटना घडल्या
शितल अमोल राठोड (रा.वावरेनगर,कामटवाडा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. राठोड बाहेरगावी गेल्या होत्या. रविवारी त्या रेल्वे प्रवास करून दुपारच्या सुमारास घरकडे परतण्यासाठी बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली.
सीटी लिंक बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी राठोड यांच्यासह अन्य एका महिलेच्या पर्सची चैन उघडून सोन्याचांदीचे व हि-याचे दागिणे तसेच रोकड असा सुमारे ९७ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार खैरे करीत आहेत.