नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आज, फाल्गुन कृ. सप्तमी शके १९४५ अर्थात सोमवार १ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिक महानगर पालिका आणि नववर्ष स्वागत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शके १९४६ (२०२४) रोजी गुढीपाडवा निमित्ताने आयोजित महारांगोळी, महावादन, अंतर्नाद, वारसा युद्धकला प्रात्यक्षिक या कार्यक्रमांसाठी पाडवा पटांगण (जुने भाजी मार्केट), नारोशंकर मंदिराजवळ, पंचवटी येथे व्यासपीठ आणि मंडप उभारणीला सुरवात झाली.
यावेळी पूजेसाठी नववर्ष स्वागत समिती अध्यक्ष शिवाजी बोंन्दार्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, जयंत गायधनी, राजेश दरगोडे, अंतर्नाद कार्यक्रम प्रमुख निनाद पंचाक्षरी, वारसा युद्धकला प्रात्यक्षिक कार्यक्रम प्रमुख तुषार देशमुख, चंदर वाघेरे हे उपस्थित होते.