नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या हुतात्मा स्मारकात रमजान महिन्याच्या निमित्ताने संविधान प्रेमी नाशिककर आणि एम्स चॅरिटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून “सर्वधर्मिय रोजा इफ्तार पार्टीचे” आयोजन ३० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५:३० वाजता करण्यात आले होते. यावेळी हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन,बौद्ध,शिख,बोहरी धर्मातील प्रमुख धर्मगुरुंनी मार्गदर्शन केले. यावेळी विचार मंचावर दिगंबर आखाड्याचे महंत भक्ति चरणदासजी महाराज,इमान गौसिया जामा मस्जिदचे मौलाना जुनेद आलम साहब
होलीक्रास चर्चचे फादर विजय गोन्सालविज्, शिंगाडा तलाव गुरूव्दाराचे कुलविंदर सिंग गुजराल,अध्यक्ष गुरु गोविंद कॉलेज, बौद्ध धम्मगुरु -भन्ते धम्मरक्षित, बोहरी धर्मगुरु आमिल साहेब युसूफ यमानी तसेच नाशिक क्राईम ब्रॅंचचे मा.प्रशांत बछाव सर , एसडीएम जितेंद्र रहेमान सर ,फैयाज मुलानी सर, कॉम्रेड राजू देसले,किरण मोहिते,सचिन जोशी,संचालक- इस्पॅलिअर स्कूल,विजय राऊत, हुतात्मा स्मारक,सलीम खान हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात श्रावस्ती मोहिते हिने “जय जय महाराष्ट्र माझा” या गीताने केली, यावेळी सर्व उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली.मुस्लिम बांधवांनी असरची नमाज अदा करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आपल्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये महंत भक्तिचरणदास यांनी सर्वधर्मिय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले व नाशिक हे तिर्थक्षेत्र असून सर्वधर्मिय येथे गुण्यागोविंदाने राहतात.नाशिक शहर हे एक शांतमय शहर आहे.आम्ही सर्वधर्मियांच्या कार्यक्रमात सहभागी होतो,आणि हाच एकात्मतेचा संदेश नाशिक मधून संपूर्ण देशाला जातो.हिंदू धर्मात सर्वांच्या मंगलकामनेविषयी प्रार्थना केली जाते.आम्ही वैयक्तिक मंगलकामना करीत नाही आणि सर्वधर्मियांच्या प्रार्थनेत मानव कल्याण व विश्वकल्याणाचाच संदेश आहे.सर्वधर्म सभांमध्ये आम्ही अनेक ठिकाणी जात असतो, परंतु रमजानच्या पवित्र दिवसात सर्वधर्मिय रोजा इफ्तारमध्ये मला बोलाविल्याबद्दल मला धन्य झाल्यासारखं वाटतं आहे, याबद्दल महंत भक्तिचरणदास यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरु मौलाना जुनेद आलम यांनी स्पष्ट केले की, इस्लाम हा शांती आणि मानवतावाद सांगणारा धर्म असून उच्च-निच,काळा-गोरा, श्रीमंत -गरिब असा भेदभाव करणारा धर्म नसून सर्वसमावेशक आहे.भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्वधर्मिय एकोप्याने लढले आहेत.हा एकोपा भारतीय सर्वधर्मियांनी भाईचारा वाढवून दृढ करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
होलीक्रास चर्चचे फादर विजय गोन्सालविज् यांनी बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याने केलेल्या चांगल्या कामाची कृतज्ञता,निसंदेह प्रेम आणि सेवाभाव या तीन गोष्टींवर अधिक भर देऊन हाच खरा धर्म सांगितला आहे.बौध्द भिक्खू धम्मरक्षित यांनीही बुध्दाच्या मानवतावादी संदेशाची स्मृती जागृत करून प्रज्ञा, शांती आणि मैत्री करुणा या बुध्दाच्या शिकवणीचा उल्लेख केला.शिख समाजाचे प्रतिनिधी कुलविंदर सिंग गुजराल यांनी गुरूनानक यांची वाणी ही मानवतावादी राहिली असून नाशिकमध्ये शिख बांधव इतर सर्व धर्मियांमध्ये सहभागी होऊन गुण्यागोविंदाने राहतात,यावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
नाशिक क्राईम ब्रॅंचचे डीसीपी प्रशांत बच्छाव यांनी स्पष्ट केले की, जन्माला आल्यावर कोणालाच आपल्या धर्माची माहिती नसते, परंतु नंतर आपल्याला धर्माची शिकवण मिळते, धर्म ही एक चांगले जीवन जगण्याची संस्कृती आहे. सर्वधर्माची शिकवण समानच आहे,व सर्वधर्मात ९९% टक्के लोक हे अतिशय चांगले आहेत,१% टक्के लोक चुकीचे समर्थक आहेत परंतु ९९% लोक जर एकत्रित असले तर १% असलेल्याचे काहीच चालणार नाही.भारतामध्ये विविधता असूनही आपण एकतेने राहत आहोत,कारण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान जगात आजही मजबूत लोकशाहीचे प्रतिक आहे.सर्वांनी भारतीय संविधानाचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
याप्रसंगी संविधान प्रेमी नाशिककर व एम्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कॉम्रेड राजू देसले व किरण मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजमल खान यांनी केले.सूत्रसंचलन मिनहाज मिर्झा यांनी केले, आभार तलहा शेख यांनी मानले. याप्रसंगी विविध धर्मिय नागरिक उपस्थित होते.रोजा उपवास सोडण्यासाठी फळफळावळींच्या आयोजनासोबतच खास महाराष्ट्रीयन पुरण पोळी व आमरसाच्या जेवणाची मेजवानी ठेवून यातूनही एकतेचा संदेश आयोजकांनी दिला.
याप्रसंगी विविध सामाजिक संस्था संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.ज्यामध्ये मुकुंद रानडे सर, मिनहाज मिर्झा, आसिफ शेख सर, सचिन मालेगांवकर ,मिलिंद वाघ, संतोष जाधव, पद्माकर इंगळे,कृष्णा शिंदे , एडव्होकेट कृष्णा सिलावट, रफीक साबिर , तंजीम खान, अजमल खान,दत्तु तुपे, एस खतीब, व्हि डी धनवटे, गुलाम शेख,निशिकांत पगारे, योगेश बर्वे, तल्हा शेख, प्राजक्ता कापडणे, फ्रान्सिस वाघमारे,अँड.प्रभाकर वायचळे आदीं मान्यवर उपस्थित होते.