नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रविवारी ३१ मार्च रोजी झालेल्या जीतो अहिंसा रनमध्ये चार हजारपेक्षा जास्त जणांनी सहभाग नोंदवत शांती आणि अहिंसेचा संदेश दिला. त्याबरोबरच स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, सुंदर नाशिक तसेच मतदानाचा संदेश देत स्पर्धक सहभागी झाले. १० किलोमीटर रन मध्ये पुरुष गटात प्रथम- रिंकू सिंग , द्वितीय- अंकित देशवाल व तृतीय- मनीष राजपूत तर महिला गटात प्रथम- पूनम सोनवणे , द्वितीय- ज्योती स्वराज व तृतीय- रिंकी पावरा यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रेम, क्षमा, त्याग ही सर्व अहिंसेचीच रूपे आहेत. जगाला भगवान महावीरांचा शांती आणि अहिंसेचा संदेश प्रसारित करण्यासाठी आयएफएएल जितोद्वारे भव्य “अहिंसा रन” चे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे हे दूसरे वर्ष होते.
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान (गोल्फ क्लब ) येथे सकाळी ६ वाजता प्रारंभ झाला. ३ किमी, ५ किमी आणि १० किमी असा मार्ग होता. प्रमुख पाहुणे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे ,जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, एमव्हीपीचे सरचिटणीस नितीन ठाकरे , ऋषभ इंस्ट्रुमेंट्सचे चेअरमन नरेंद्र गोलिया, ज्येष्ठ उद्योजक सतिष पारख आदी मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी व उत्साह वाढविण्यासाठी उपस्थित होते. स्पर्धेच्या सुरुवातीला झुंबा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
पारितोषिक वितरण समारंभाला व्यासपीठावर सुमेरकुमार काला, नामको बँक चेअरमन सोहनलाल भंडारी, ग्लोबल स्कूलचे केन केंद्रे, निलेश बोरा वर्धमान लुंकड, शांतीलाल बाफणा, ललित मोदी, अनिल जैन, पंकज पटनी, प्रशांत मुथा, हर्षित पहाडे, सौरभ पारख, पारस साखला, संतोष मंडलेचा, सुनीता बोहरा, वंदना तातेड, आस्था कटारिया, अंकिता पारख, निकेत चतुरमुथा, मिता मुथा, मनीषा चोपडा, पीआरओ सोनल दगडे आदी जितोचे सर्व माजी अध्यक्षा उपस्थित होते. जितो अध्यक्षा कल्पना पटणी यांनी स्वागत, प्रस्ताविक वैशाली जैन केले. सेक्रेटरी संदीप पहाडे यांनी आभार मानले. विशेष म्हणजे अहिंसा रन केवळ एक समुदायापुरती मर्यादित न ठेवता अहिंसेच्या बाजूने असलेल्या लोकांना स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. यावेळी यंदाच्या निवडणुकीत मतदान करण्याची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.
८५ वर्षावरील धावपटुंचा विशेष सन्मान करण्यात आला तसेच ४० वर्षावरील स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल देण्यात आले. सौरभ पारख, मनीषा शाह, मोनालिसा जैन, नीता मंडलेचा, सपना संदीप पहाड़े, सपना शशांक पहाडे, आरती नहार, अंजली पींचा, दीपाली बोरा, दीपा ब्रम्हेचा, सोनम ब्रम्हेचा, टीना बाफना, श्वेता बंब यांसह मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे जोशपूर्ण सूत्रसंचालन परी ठोसर – जोशी व रोहन मेहता, सतीश हिरन यांनी केले. असाच उपक्रम काल याच वेळेत विविध शहरात करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मैदानावर प्रथमोपचार केंद्र, माहिती कक्ष यांची व्यवस्था करण्यात आली होती.