नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लोकसंवाद यात्रेनंतर आता काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांची नागपूर येथे जन आर्शीवाद यात्रा निघणार आहे. सामान्यांचा आवाज गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार विकास ठाकरे आज १ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता पासून दक्षिण नागपूर पिंजून काढणार आहे. त्यांच्या सोबत इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांचीही उपस्थिती राहील असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
रविवारी ठाकरे यांनी शहरातील विविध भागात पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेतली. प्रत्येक बैठकीत मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. नागरिकांकडून त्यांना उदंड प्रतिसाद लाभत असून जनताच लबाडांना धडा शिकवणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
जन आशीर्वाद यात्रेचा मार्ग
जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात राजाबाक्षा हनुमान मंदिर येथे माल्यार्पण करुन ऑरियस हॉस्पिटलच्या मागील भाग- वंजारी नगर-दर्गा परिसर-रेल्वे ग्राऊंड पेट्रोल पंप- कुकडे लेआऊट परिसर- न्यू एपोस्टेलिक शाळेचा परिसर-जोशी वाडीच्या मागील परिसर-मानवता शाळा चौक-कुंजीलाल पेठ परिसर-बाबुलखेडा परिसर-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन सिमेंट रोडने डावीकडे बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोरुन- जीवन मेडिकल चौककडून सरळ साईनाथ शाळा रोड-डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज समोरुन प्रगती नगर रोड ते उजवीकडे वळून सरळ लेबर ठिय्या चौक-मानेवाडा रोड डावीकडे वळून कुदरत पान मंदिर-ज्ञानेश्वर नगर गेट समोरुन सिद्धेश्वर सभागृह चौक- उजवीकडे वळून शारदा चौक जवाहर नगर परिसर-पोलीस क्वॉर्टर – बाल हनुमान मंदिर चौक- उजवीकडून वळून महाकाळकर बिल्डिंग-उजवीकडे वळून सुधांशू सभागृह-सुर्वे लेआऊट-सोनझरी नगर महाकाळकर सभागृह-बीडीपेठ परिसर-आशीर्वाद नगर परिसर-राजलक्ष्मी सभागृह येथे यात्रा थांबेल.