मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –वंचित बहुजन आघाडीने राज्यातील लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिली यादी आठ उमेदवारांची होती. आता दुसरी यादी ११ उमेदवारांची आहे. त्यामुळे वंचितचे १९ उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले आहे. महाविकास आघाडीने वंचितला सहा जागांची ऑफर दिली होती. पण, वंचितने आपला वेगळा मार्ग निवडत ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीबरोबर काडीमोड घेतल्यानंतर वंचित तिसरी आघाडी म्हणून लोकसभेच्या जागा लढवणार आहे. मागील लोकसभेची पुनरावृत्ती करत ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे त्याचा फटका आता कोणाला कसा बसतो हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी वंचितची दुसरी यादी
हिंगोली – डॉ. बी.डी.चव्हाण
लातूर -नरसिंगराव उदगीरकर
सोलापूर- राहुल काशिनाथ गायकवाड
माढा – रमेश नागनाथ बारस्कर
सातारा- मारुती धोडीराम जानकर
धुळे- अब्दुर रहमान
हातकणंगले – दादासाहेब उर्फ दादागौडा
रावेर – संजय पंडित ब्राह्मणे
जालना – प्रभाकर देवमण बाकले
मुंबई उत्तर मध्य – अब्दुल हसन खान
रत्नागिरी- सिंधदुर्ग – काका जोशी
लोकसभा मतदार संघ उमेदवारांची पहिली यादी
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – कु. प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार