इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भंडारा: मानवधर्माची शिकवण देणारे बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या सेवकांबद्दल आक्षेपार्ह विधान बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज उर्फ बागेश्वर महाराज यांनी केल्याने त्यांच्या विरुध्द मोहाडी, नागपूरसह विविध ठिकाणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाली आहे. बाबा बागेश्वरांना अटक करा, या मागणीसाठी मोहाडी पोलिस ठाण्यातसेवकांनी गर्दी केली होती. वादग्रस्त विधानानंतर मोहाडीमध्ये बागेश्वर महाराजांचे बॅनर्स, पोस्टर्स फाडण्यात आले आहे.
मोहाडीत बागेश्वर महाराज यांच्या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या भागवत सप्ताहात महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात भावना दुखावणारे वादग्रस्त विधान त्यांनी केले. भावना दुखावलेल्या परमात्मा एक सेवकांनी आणि बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी बागेश्वर महाराजांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या.