नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सप्तशृंग गडावर सोमवार, १ एप्रिल पासून एसटी महामंडळ इलेक्ट्रीक बस सेवा सुरू करणार आहे. साडेतीन शक्ती पीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर विविध भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात, त्यामुळे एसटी महामंडळ ही बस सेवा सुरू केली आहेत. सकाळी ५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत बस जुने सीबीएस येथून सुटणार आहे.