नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –खेळाडू खरेदी करून, कर्णधाराला धमकावून, पंचावर दबाव टाकून आणि ईव्हीएमच्या आधारे ४०० पार करण्याचा नारा दिला जात आहे. प्रत्यक्षात सर्वकाही एकत्र करूनही तो १८० पार करण्याच्या स्थितीत नाही. ही निवडणूक केवळ सरकार स्थापनेची निवडणूक नाही. तर ही निवडणूक देशाचे, संविधानाचे आणि जनतेचे हक्क वाचवणारी आहे… नरेंद्र मोदींना ‘मॅच फिक्सिंग’ करून निवडणुका जिंकून संविधान बदलायचे असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. यावेळी सामना सुरु होण्याअगोदर आमच्या दोन खेळाडूंना अटक केल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ दिल्ली येथे रामलीला मैदानावर आयोजित केलेल्या इंडिया आघआडीच्या महारॅलीत ते बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले की, मी जातीनिहाय जनगणना, शेतकऱ्यांचा एमएसपी, बेरोजगारी यावर बोललो – कारण हे देशाचे सर्वात मोठे प्रश्न आहेत. पण जर तुम्ही पूर्ण ताकदीने मतदान केले नाही तर त्यांचे मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. मॅच फिक्सिंग यशस्वी होताच संविधान संपेल.
या महारॅलीत मोठ्या संख्येने इंडिया आघाडीचे नेते उपस्थितीत होते.