इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी एका विवाह समारंभात वधू-वरांना आशीवार्द देताना केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. या विधानानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी टीका केली आहे.
डॉ. कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला त्यांनी हजेरी लावली. कोल्हे यांना थोडा उशीर झाला. तुम्हाला उशीर का झाला, असे एकाने त्यांना विचारलं. याच प्रश्नाचे उत्तर देताना खा. कोल्हे यांनी तुतारी, घड्याळ या निवडणूक चिन्हांचा उल्लेख करत वधू-वरांना आशीर्वाद दिले. घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाही; पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी, असे ते म्हणाले. ले.
या कार्यक्रमात कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पत्नीचे त्यांनी आशीर्वाद घेतले. या वेळी कोल्हे यांनी मोहिते पाटलांना कोपरखळी मारली. तुम्ही आशीर्वाद दिला म्हणजे मला मोहिते पाटलांनाही खासदार होण्यासाठी आशीर्वाद दिला, असे समजतो, असे खा. कोल्हे म्हणताच लग्नमंडपात चांगलाच हशा पिकला.