इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निमित्ताने ‘इंडिया’ आघाडीचे नेते निवडणुकीपूर्वी एका मंचावर आज आले होते. या महारॅलीत उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, माझ्या देशातील भारतीय घाबरणारे नाहीत. तर लढणारे आहेत असे सांगत त्यांनी खुले आव्हान दिले की हिंमत असेल तर तुमच्या बॅनरवर लिहा की, ईडी, सीबीआय, आय़टी डिपार्टमेंट भाजपचे तीन साथी पक्ष आहे. अरविंद केजरीवाल व हेमंक सोरेने यांच्यावर आरोप करुन त्यांना तुरुंगात टाकले ही कोणती पध्दत आहे असा सवालही त्यांनी केला.
आज दिल्लीतील रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा संयुक्त विराट सभा झाली. या सभेसाठी देशभरातील इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले होते. ‘हुकूमशाही हटाव, लोकशाही वाचवा’ अशी घोषणा रॅलीत देण्यात आले. या सभेत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह विरोधी पक्षांचे डझनभर मोठे नेते सहभागी झाले होते. या रॅलीत शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव हेही सहभागी झाले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या वतीने डेरेक ओब्रायन रॅलीत सहभागी झाले आहेत.
केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासोबतच विरोधक ऐतिहासिक रामलीला मैदानातून निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली. या सभेत उध्दव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.