नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आपच्या अडचणी कमी होताांना दिसत नाही. दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणात आणखी एका मंत्र्याला ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. दिल्लीचे मंत्री कैलाश गहलोत यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.
गहलोत हे दिल्लीच्या नजफगड मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. दिल्ली सरकारमध्ये त्यांच्याकडे वाहतूक, गृह आणि विधी या खात्याची जबाबदारी आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली. एक एप्रिलपर्यंत त्यांना ‘ईडी’ कोठडी देण्यात आली आहे. आम आदमी पक्षाच्या सरकारने २०२१ मध्ये दिल्लीसाठी नवे मद्यधोरण आणले. मद्यधोरण घोटाळ्यात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग, विजय नायर हे ‘आप’चे नेते तुरुंगात आहेत. आता पुन्ही ईडीने एका मंत्र्याला समन्स बजावले आहे.