गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आता अंध मतदारांच्या सोयीसाठी ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिट्टी…इतके आहे अंध मतदार

by Gautam Sancheti
मार्च 30, 2024 | 7:56 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240330 WA0380

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी येथे दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री एस. चोक्कलिंगम् बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

यावेळी श्री.चोक्कलिंगम् यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे 1,16,518 अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने 40% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व 85 वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना 12 डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून दि. 28 मार्च पर्यंत 85 वयावरील जेष्ठ नागरिक यामध्ये 17 हजार 850 मतदारांचे तसेच 40% दिव्यांगत्व असलेले 5 हजार 453 दिव्यांग मतदारांचे 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील 53 मतदारांचे 28 मार्च पर्यंत 12 डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.

भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत 190 अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या 241 एवढ्या प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे / पोस्टर/ ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पुर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम देखरेख व संनियत्रण समिती व अपिलिय समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीकडे पूर्व प्रमाणिकरणासाठी (PRE CERTIFICATION) साठी दोन राजकीय पक्षांचे दोन अर्ज प्राप्त झाले असून कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती श्री.चोक्कलिंगम् यांनी यावेळी दिली. तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राज्यभरातील 48 लोकसभा मतदार संघामध्ये अवैध रोख रक्कम, दारु, ड्रग्ज इ. जप्त करण्यासाठी 1 हजार 656 Flying Squad Team (FST) व 2096 Static Surveillance Team (SST) स्थापन करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी श्री.धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी श्री.एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे. राज्यामध्ये या निवडणूकीसाठी 98 हजार 114 इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था यंत्रणेमार्फत दि. 28 मार्च पर्यंत 27,745 शस्त्रास्त्रे जमा करण्यात आली आहेत तसेच 190 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली 557 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून CRPC कायद्यांतर्गत 27,685 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या जप्तीची माहिती
राज्यामध्ये दि. 1 ते 28 मार्च या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या बेकायदा पैसे, दारु, ड्रग्ज व मौल्यवान धातु इ. बाबींच्या जप्तीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बारामतीतून सुनेत्रा पवारांची अधिकृत उमेदवारी जाहीर…जानकर यांना परभणीतून उमेदवारी

Next Post

राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई…अवैध दारुसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
IMG 20240330 WA0382 1 e1711809873440

राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई…अवैध दारुसह २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011