इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची पहिली यादी आज जाहीर झाली. त्यात बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा, नगर या मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यात आले. बारामतीमध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, नगरमधून नीलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे, वर्धातून अमर काळे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. सातारा, भिवंडी, माढा, बीड, रावेर या मतदार संघाचे उमेदवार अद्याप निश्चित झालेले नाही.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत एका महिलेला स्थान देण्यात आले आहे. वर्ध्यातून निलेश कराळे गुरुजी हे इच्छुक होते. त्यांनी शरद पवार यांची तीनदा भेट घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेशही केला. पण, त्यांच्या एेवजी राष्ट्रवादीने अमर काळे यांना उमेदवारी दिली.
महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाला २२, काँग्रेस १६ आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा असे जागावाटप झाले आहेत. यातील महाविकास आघाडीचे ४४ जागेवर एकमत झाले आहे. पण, चार जागांवर अजून निर्णय होणे बाकी आहे. यातील ठाकरे गटाने १७ जागांची यादी जाहीर केली आहे. तर कॉंग्रेसनेही १२ जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. पण, शरद पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नव्हती ती आज जाहीर झाली. त्यात १० पैकी ५ नावे जाहीर करण्यात आले.