इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठवाड्यामधील एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु असतांना ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेत आपला संताप व्यक्त केला. कोणत्याही आधार नसलेल्या बातम्या दाखवल्या जात आहे. बातमी दाखवायची तर अचूक दाखवा. भाजप प्रवेशाच्या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी सांगितले. चुकीच्या बातम्या दाखवणा-या विरुध्द मानहानीचा दावा दाखल करणार असा इशाराही त्यांनी दिला.
मी नाराज नाही. मी छत्रपती संभाजी नगरमध्ये लोकसभेची उमेदवारी मागीतली होती. त्यानंतर खैरे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे आता मी नाराज नाही. ही जागा आम्ही मोठ्या मताधिक्याने जिंकू असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महायुतीला अजून उमेदवार भेटत नसल्याचेही सांगितले.
आज भाजपमध्ये लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबरच ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. त्यात अंबादास दानवे यांचे नाव घेतले जात होते. त्यामुळे दानवे यांनी खुलासा करत असतांना आपला संतापही व्यक्त केला.