नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टीच्या संकल्प पत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना सूचना पाठवण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पार्टी नाशिक महानगरच्या वतीने नागरिकांद्वारे आलेल्या सूचनांचे संकलन करून सूचना पेट्या प्रदेश कार्यालयात सुपूर्द केल्या. विकसित भारत घडवण्यासाठी आलेल्या सर्व सूचनांची गांभीर्याने दखल भारतीय जनता पक्षाद्वारे घेतली जाईल असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र महाले यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस
नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
https://twitter.com/cbawankule/status/1773656648529133830