इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः लोकसभेचे माजी सभापती शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पक्ष प्रवेशाबाबत चर्चा करून भाजप प्रवेशाची तारीख निश्चित केली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मराठवाड्यात आता पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. चाकूरकर यांचे मानसपुत्र अशी ओळख असणारे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता चाकूरकर यांची सून भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
मुंबईमधील भाजप कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. चाकूरकर कुटुंबीयातून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.