इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणुकीत या पक्षातील नेत्यांचे पक्षांतर सर्वत्र सुरु आहे. राज्यातही मोठ मोठे नेते या स्वपक्षातून दुस-या पक्षात जातांना दिसत आहे. त्यामुळे काहींना बळ तर काहींचे नुकसान होत आहे. राज्यात सत्तेत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या लोकसभेत आज पहिला धक्का बसला आहे. त्यांच्या गटाचे आमदार नीलेश लंके यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला असून ते शरद पवार गटात अधिकृतपणे प्रवेश करणार आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची भाजपची उमेदवारी खा. सुजय विखे यांना जाहीर झाल्यांनतर त्यांच्या विरोधात रणांगणात उतरण्यासाठी आमदार लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्यास ते इच्छुक आहेत. भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, ते शरद पवारांबरोबर दिसले होते. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरु होती. आज ती खरी ठरली.
लंके यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली. त्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा देतोय असे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी राजीनामा वाचून दाखवला. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरे जाऊन असे जाहीर केले.
शरद पवार गटाकडून त्यांना अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता या मतदार संघात विखेपाटील विरुध्द लंके अशी लढत रंगणार आहे.