इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दोन तारखेपर्यंत भाजपविरोधी मजबूत आघाडी उभी राहिलेली दिसेल असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी तिस-या आघाडीचे संकेत दिले. ते म्हणले की, जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याबरोबर चर्चा सुरु होती. तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होतं. र्चा पुढे जात होती. पण, नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरुन घेत असल्याचे दिसू लागले. आम्हाला वेगळे पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता आम्ही २ एप्रिल रोजी सर्व काही क्लिअर करु…तसेचे माझे दरवाजे आजही बंद झालेले नाही. सर्वांसाठी दरवाजे खुले आहेत असेही ते म्हणाले.
२ एप्रिल रोजी भाजप विरोधी आघाडीला सुरुवात होईल त्यावेळे सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. आमच्या बरोबर कोण असेल आणि आम्ही कुणासोबत असून याची सर्व माहिती २ तारखेला दिली जाईल.
यावेळी त्यांनी संजय राऊत आणि मविआ वेगळे आहेत. तीन जागांच्या पलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव मविआकडून आलेला नाही .काँग्रेस – शिवसेना सुत जुळलेले नाही हे आता उघड होत आहे असेही त्यांनी सांगितले.