इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आष्टी ते अहमदनगर या डेमू रेल्वेच्या पाच ५ डब्यांना आग लागल्याची घटना घडली. दुपारी ३ वाजता, गार्ड-साइड ब्रेक व्हॅनमध्ये आणि त्याला लागून असलेले ४ डबे याला ही आग लागली. या आगीनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु करण्यात आले.
या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही आणि कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. ही आग पसरण्यापूर्वी ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप खाली उतरले. दौंडहून घटनास्थळी रेल्वे एआरटी (अपघात मदत गाडी) पाठवण्यात आल्याचेही रेल्वेने सांगितले. ही आग कशामुळे लागली याची माहीत अद्याप समोर आलेली नाही.
सोमवारी सकाळी नगरहून ही गाडी प्रवासी घेऊन आष्टीला गेली. तेथून परत येत असतांना नगर तालुक्यातील वाळूज या गावाजवळ ही आग लागली. नगर – बीड -परळी या मार्गावर सप्टेंबर २०२२ मध्ये नगर ते आष्टी हे काम पूर्ण झालेल्या टप्यात ही रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. याच टप्प्यात ही आग लागली.
रेल्वेने दिली ही माहिती
https://x.com/Central_Railway/status/1713872043865973013?s=20