नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नरेडको नाशिकची २०२४-२०२६ ची नूतन कार्यकारिणी तसेच नरेडको युवा प्रतिनिधी म्हणजेच NextGen कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात आली. २७ मार्च, २०२४ रोजी नरेडको नाशिकची सन २०२४-२०२६ ची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली, अध्यक्षपदी सुनील गवादे, IPP (immediate past president)- अभय तातेड उपाध्यक्ष- उदय शाह, मर्जियान पटेल तर सचिवपदी शंतनू देशपांडे तसेच खजिनदार भूषण महाजन सह सचिव – प्रदीप पटेल, हर्षल धांडे, गव्हर्निंग कॉउंसिल मेंबर – प्रशांत पाटील, ताराचंद गुप्ता, मुकुंद साबू ,भाविक ठक्कर,अभय नेरकर, कॉपटेड मेंबर -अश्विन आव्हाड ,प्रसन्न सायखेडकर ,पवन भगुरकर,विक्रांत जाधव. आमंत्रित सदस्य :पंकज जाधव,परेश शाह, सल्लागार समिती सदस्य : राजेंद्र बागड,मार्गदर्शक : जयेश ठक्कर, अविनाश शिरुडे, सुनील भायभंग, अभय साकरे, मार्गदर्शक सदस्य : ॲडव्होकेट सुबोध शाह, मनीष चिंधडे, अजय निकम, आर्किटेक्ट संजय म्हाळस, दिनेश भामरे,कुलदीप चावरे, इंजिनीअर मोहन रानडे ,चार्टर्ड अकाऊंटंट तुषार लोखंडे ,परेश साभद्रा.
NAREDCO NextGen कार्यकारिणी २०२४-२०२६
अध्यक्ष – पुरुषोत्तम देशपांडे, उपाध्यक्ष -रुचिक शिरोडे, गिरीश मलानी, सचिव -हर्षल पाटील खजिनदार -मोहित
खिवंसरा, सह सचिव- शुभम पाटील, विशाल कोठावदे
कमिटी मेंबर :राहुल भायभंग,अमित खेमानी ,श्रीहर्ष घुगे,हितेश गोडसे ,कैवल्य जगताप ,तरुण चन्दवानी
आकाश कापडने ,मयूर नंदन ,आदित्य कांगणे, रिद्धेश निमसे ,यश तुलसीयान
सहकारी सदस्य -रुपेश बागड ,आशिष सोनावणे, नित्या पटेल
कालरोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी म्हणून जयेश ठक्कर, अविनाश शिरोडे, अभय साकरे यांनी निवडीचे कामकाज पहिले. नूतन पदाधिकाऱ्यांनी काल नरेडको नाशिकची सूत्रे हाती घेतली.मावळते अध्यक्ष अभय तातेड यांनी त्यांच्या कारकिर्दीचा आढावा उपस्थित सदस्यांपुढे मांडला. संघटनेच्या हितासाठी नवीन कार्यकारिणीस कायम पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.
नवीन गुतंवणूकीसाठी प्राधान्य देणार -अध्यक्ष सुनील गवांदे
अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेले सुनील गवादे यांनी सांगितले की, नाशिकमधील बांधकाम उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करणे हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. नाशिक हे प्रगतशील व सुसंकृत शहर असून नाशिकची भूमी कायम व्यवसाय वृद्धी, उपक्रमशीलता,संस्कार आपुलकी, कुंभनगरी म्हणून सैदव सुपरिचित व प्रेरणदायी राहिलेली आहे. नाशिक एक स्मार्ट गुंतवणूक डेस्टिनेशन असून याला सर्वार्थाने अग्रणी ठेऊन शहराचा विस्तार करण्यास प्राधान्य देणार असून नवीन गुंतवणूक नाशिक शहरात यावी म्हणून प्रयत्न करणार आहे.
सेमिनारचे आयोजन करणार -पुरुषोत्तम देशपांडे
नरेडको nextgen अध्यक्ष पुरुषोत्तम देशपांडे यांनी वरिष्ठ कार्यकारिणीचेआभार मानत कामकाज करतांना येत्या काळात नाशिक तसेच मुंबई, पुणे, दिल्ली site visit, स्टडी टूर, सेल्स व मार्केटिंग सेमिनार आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. युवापिढीला अभिप्रेत असणारे सर्वसमावेशक व तंत्रज्ञान आधारित कामकाज करू असे सांगितले.
कौतुक व आभार
नरेडको नाशिक सभेप्रसंगी नरेडको महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत शर्मा, यांनी नरेडकोच्या विद्यमान कार्यकारिणीच्या उत्कृष्ट कामकाजाचे कौतुक करून नरेडकोची सभासद संख्या वाढविणेबाबत लक्ष केंद्रित करण्याची सूचना केली. नरेडको महाराष्ट्र उपाध्यक्ष उपाध्यक्ष हितेश ठक्कर, मौलिक दवे, खजिनदार हितेश भगतानी यांनीहि नरेडकोच्या कामकाजाचे व सभेचे नियोजन उत्तमरीत्या केलेबाबत समाधान व्यक्त केले. सभेत नाशिक शहरातील अग्रणी संघटना / संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर तसेच नरेडको नाशिकचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच रेरा विषयक अडचणी, स्थानिक प्रश्न मंत्रालय स्तरावर मांडण्याचे आश्वासन दिले. सभेचे सूत्रसंचालन भूषण महाजन व आभार प्रदर्शन भाविक ठक्कर यांनी केले.