नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लग्नाचे आमिष दाखवून इगतपुरी येथील एकाने वेळोवेळी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलत्कार,पोस्को आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताचा अतिरेक वाढल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी
सुशांत बच्चू पाराडे (३० रा.इगतपुरी जि.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन पिडीतेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित आणि पिडीत यांच्यात मैत्री होती. सन. २०२२ मध्ये या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याने हा प्रकार घडला.
संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून मुलीस वेळोवेळी त्र्यंबकेश्वर येथील वृंदावन लॉज आणि नाशिक रोड येथील मुक्तीधाम परिसरातील नटराज लॉज येथे घेवून जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. संशयिताचा अतिरेक वाढल्याने मुलीने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण कोरडे करीत आहेत.