इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
साता-यातून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करण्यास नकार दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिली. येत्या दोन ते तीन दिवसात साता-यातील उमेदवारी घोषणा केली जाईल असेही ते म्हणाले.
पवार आज सातारा दौ-यावर आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की. श्रीनिवास पाटील यांची कामगिरी चांगली होती. त्यांनी संसदेत चांगले काम केले. पण, आरोग्याचे काही प्रश्न असल्याने त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.
साता-यातून कोण उमेदवार
श्रीनिवास पाटील यांनी नकार दिल्यानंतर आमदार बाळासाहेब पाटील, सुनील माने, आमदार शशिकांत शिंदे, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर नावाची चर्चा सुरु आहे. साता-यातील बहुतांश कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनीच उमेदवारी करावी अशी मागणी केली आहे.