इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचे कारत देत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चिमटा काढला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वोत्तम_कामगिरी करूनही खुद्द अर्थमंत्र्यांनाही निवडून येण्यासाठी पैशांची गरज लागावी, हे आश्चर्यजनकच आहे! असे म्हटले आहे.
रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसल्याचं मान्य करतानाच देशाचं आर्थिक गणित फसलंय याचीच कबुली एकप्रकारे केंद्रीय अर्थमंत्री महोदयांनी दिली, याबाबत त्यांचे आभार! देशाच्या अर्थमंत्र्यांकडेच पैसे नसतील तर आज सामान्य माणसांची काय अवस्था असेल, याची कल्पना यावरून येते..
असो!
मोदी साहेबांसारखा ब्रँड असूनही आणि अर्थमंत्री म्हणून दहा वर्षे #सर्वोत्तम_कामगिरी करूनही खुद्द अर्थमंत्र्यांनाही निवडून येण्यासाठी पैशांची गरज लागावी, हे आश्चर्यजनकच आहे!