इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दोन सामने जिंकून मालिका खिशात घातल्यानंतर तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३५३ धावा आव्हान दिले होते. मात्र भारतीय संघाने सर्वबाद २८६ धावापर्यंत मजल मारली. या सामन्यात भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला. भारताने मालिका भारताने २-१ ने जिंकली असली तरी शेवटचा सामना मात्र गमावला.
या सामन्यात भारताने फलंदाजी करतांना रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पण, वॉशिंग्टन सुंदर सूर गवसला नाही. त्याने ३० चेंडूत १८ धाव केल्या व तो बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या गड्यासाठी रोहित आणि विराटने चांगली भागीदारी केली. भारताकडून रोहित शर्माने ५७ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. यात ५ चौकार आमि ६ षटकारांचा समावेश आहे. तर विराट कोहलीने ५६ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचं अर्धशतक अवघ्या दोन धावांनी हुकले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५० षटकात ७ गडी गमवून ३५२ धावा केल्या.या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श जोडीने आक्रमक सुरुवात करुन पहिल्या गड्यासाठी दोघांनी ७८ धावांची भागीदारी केली. पण, चुकीचा फटका मारण्याच्या डेविड वॉर्नर बाद झाला. मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श याने जबरदस्त खेळी केली. मात्र शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं. ९६ धावांवर असताना तो बाद झाला.
या सामन्यात रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळत आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड हे खेळाडून रिंगणात असतांना भारताला शेवटचा सामना मात्र गमवावा लागला.