मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात रोजच उन्हाचा पारा वाढत असून आज मालेगावचे तापमान ४१.२ अंशावर गेले. काल तापमान ४१ अंशावर होते. वाढत्या तापमानामुळे दुपार नंतर शहरातील रस्त्यावरची वर्दळ कमी झाल्याचे चित्र होते.
कामा निमित्त बाहेर पडणाऱ्यांना तीव्र उन्हाचा चटका सहन करावा लागत आहे. मालेगावचे तापमान नेहमीच जास्त असते. त्यामुळे येथील उन्हाळा सर्वसामान्यांना चांगलाचा त्रासदायकही ठरतो.