इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. राऊस अव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीत ईडी’ कोठडीत चार दिवसांची वाढ करण्याचा आदेश देण्यात आल्यामुळे केजरीवाल यांचा मुक्काम अजून कोठडीतच राहणार आहे. एक एप्रियपर्यंत कोठडीत राहणार आहेत. न्यायालयीन सुनावणीच्या वेळ केजरीवाल यांनी स्वतः आपली बाजू मांडली.
‘ईडी’ने केजरीवाल यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ करण्याची मागणी केली होती. युक्तिवाद ऐकल्यानंतर राऊस अव्हेन्यू कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीच्या वेळी केजरीवाल म्हणाले, की या प्रकरणात माझे नाव फक्त चार ठिकाणी आले आहे. चार जबाबाच्या आधारे मला गोवण्यात आले. मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी ही चार विधाने पुरेशी आहेत का?
‘ईडी’ ने त्यावर बाजू मांडताना मुख्यमंत्री कायद्याच्या वर नाहीत आणि न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असताना त्यांना तुरुंगातून सरकार चालवता येणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले होते. त्यावर केजरीवाल यांनी आक्षेप घेतला. हे राजकीय षडयंत्र असून, त्याचे उत्तर जनता देईल, असे ते म्हणाले.