इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटला असून लवकरच उमेदवारी यादी घोषित केली जाणार आहे. त्याअगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अभिनेता गोविंदा याला शिवसेनेत प्रवेश दिला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी गोविंदाने आपले मनोगत व्यक्त केले. उत्तर पश्चिम मुंबईतून गोविंदाला शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती.
पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की ते निवडणुकीसाठी आले नाही. त्यांना तिकीट नको आहे. ते विकास कामे बघून शिवसेनेत आले आहे. त्यांनी प्रवेश करतांना कोणतीही अट टाकली नाही.