नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनामी करण्याची धमकी देत घरात घुसून परिचीतानेंच हे कृत्य केले आहे. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या संशयितास अटक करण्यात आली आहे.
राजू पांडूरंग मकासरे (४० रा.घरकुल योजना चुंचाळे) असे संशयिताचे नाव आहे. संशयित व पीडिता एकमेकांचे परिचीत असून ते एकाच भागात राहतात. मंगळवारी (दि.२६) दुपारच्या सुमारास महिला आपल्या घरात एकटी असतांना संशयिताने तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी त्याने बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला.
या घटनेनंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी संशयितास तात्काळ अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक संदिप शेवाळे करीत आहेत.