नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात वेगवेगळया भागात राहणा-या दोघांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर दुस-याने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड आणि आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
अंबड औद्योगीक वसाहतीतील म्हाडा कॉलनीत राहणा-या श्रावण देवश्री गुरनुले (५०) यांनी मंगळवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून डीजीपीनगर येथील गुलमोहर कॉलनीत असलेल्या सुवास्तू अपार्टमेंटमधील वॉचमन रूममध्ये पंख्याच्या हुकास कापड बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दिनेश दळवी यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार टोपले करीत आहेत.
दुसरी घटना ओढा ता.जि.नाशिक येथे घडली. तानाजी बाबुराव पडवळ (६५ रा.जयभवानीनगर,ओढा) यांनी गेल्या रविवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही घटना निदर्शनास येताच चुलत भाऊ मनोज पडवळ यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.बलया यादव यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.