इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राजकारण कोणी कोणाचा मित्र व शत्रूही नसतो..महाराष्ट्रात ती परंपरा बहुतांश राजकीय नेते जोपासतात. गेल्या काही दिवसात त्यात थोडा बदल झाला असला तरी महाराष्ट्राची संस्कृतीचा प्रत्यय मात्र आजही दिसतो. शिरुर लोकसभा मतदार संघात प्रचारात असाच काहीसा अनुभव मतदारांनी अनुभवला..
राष्ट्रवादी पवार गटाचे उमेदवार डॅा. अमोल कोल्हे व शिंदे गटातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेलेले शिवाजीराव आढराव पाटील यांची प्रचारा दरम्यान भेट झाली. त्यावेळी डॅा. कोल्हे यांना त्यांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर दोन्ही एकमेकांशी बोलले व पुढील प्रचारासाठी दोघेही निघून गेले.
या भेटीचा व्हिडिओ डॅा. अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे राजकारण हा पिंड नाही…”शिवसंस्कार” हाच आमचा पिंड !