इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार व विजय शिवतारे यांचा वाद शमण्याची चिन्ह नव्हती. पण, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद आता शमवण्यात य़श आले आहे. दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत अजितदादा आणि शिवतारे यांच्यात दिलजमाई झाली आहे.
बुधवारी रात्री उशीरा झालेल्या एका बैठकीत हा समेट झाला. आज शिवतारे पत्रकार परिषद घेऊन सविस्तरपणे आपली भूमिका मांडणार आहे.
याअगोदर शिवतारे यांनी बारामतीतून १२ एप्रिलला १२ वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणाच करुन टाकली होती. त्यामुळे बारामती सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार व विजय शिवतारे यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. पण, शिवतारे यांचे बंड शमवण्यात यश आल्यामुळे आता आमनेसामने सामना बारामतीत रंगणार आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन बैठका घेऊन सुध्दा शिवतारे निवडणूक लढवण्यावर ठाम होते. लोकसभा लढवणार म्हणजे लढवणार, मी बारामतीमधून निवडणूक लढवावी अशी लोकभावना आहे असेही ते म्हणाले होते. पण, आता ते माघार घेणार असल्याचे जवळपास ठरले आहे.
शिवतारे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली होती. एकीकडे पवार विरुध्द पवार अशी लढत असतांना त्यांना स्वकीयांकडूनच विरोध होत असतांना महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचा उमेदवार त्यांच्या विरुध्द दंड थोपटून उभा असल्यामुळे त्याचे पडसादही या निवडणुकीत पडणार होते. पण, महायुतीने शितारे यांचे बंड शमवण्यात अखेर यश मिळवले.