इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आयपीएलमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करुन सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव झाला आहे. सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ३ गडी गमावत २७७ धावा करुन आतापर्यंतच विक्रम मोडला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने कडवी झुंज देत २० ओव्हरमध्ये पाच गडी गमावत २४६ धावा केल्या. तिलक वर्मा याने सर्वाधिक ६४ धावांची करत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रचला.
आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा २७७ चा स्कोअर केला. आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढत त्यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धुलाई केली. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2013 मध्ये २६३ धावा केल्या होत्या. तेव्हापासून १० वर्षे हा विक्रम अबाधित होता. पण, सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करत २० ओव्हरमध्ये ३ गडी गमावत २७७ धावा करुन आतापर्यंतच विक्रम मोडला.