सोमवार, ऑगस्ट 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मॉडेल स्कूलच्या सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांशी असा साधला संवाद…

by Gautam Sancheti
मार्च 27, 2024 | 10:44 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240327 WA0354

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा परिषद नाशिक शिक्षण विभागात अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात मॉडेल स्कूल हा उपक्रमात राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या ६४९ शाळांमधील विद्यार्थ्यांशी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संवाद साधला. यामध्ये अभ्यास कसा करावा? या विषयी शिक्षणतज्ञ सचिन जोशी,उद्योजक कसे बनावे? या विषयी अरविंद नारायणन व सुशिल मुणगेकर आणि Spelling Bee स्पर्धेबद्दल बद्दल रितू मुथा, ज्युड औगस्टीन यांनी मार्गदर्शन केले. मॉडेल स्कूल मधील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना एकाच वेळी मॉडेल स्कूल संवाद कार्यक्रमात उपस्थित होते.

गेल्या वर्षीपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत मॉडेल स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमांतर्गत मागील वर्षाच्या १२८ व यंदाच्या वर्षीच्या ५२१ एकूण ६४९ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली असून भौतिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्टीच्या पूर्वी सुट्टीसह विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी या मार्गदर्शनपर संवादाचे आयोजन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना भविष्यात काय करायचं आहे त्यांची स्वप्न काय आहे, त्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे विद्यार्थ्यांनी एका वहीत लिहून काढावे, जिल्हा परिषद हे मार्फत जिल्हास्तरीय स्पेलिंग बी स्पर्धा ही आयोजित केली जाते यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच उन्हाळ्याच्या सुट्टीत स्पेलिंग बी स्पर्धेची तयारी करावी शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, आगामी निवडणुकीत मतदार जनजागृतीसाठी शाळा स्तरावरती विविध उपक्रम राबवण्यात यावे अशा सूचना यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केल्या.

शिक्षण तज्ञ सचिन जोशी यांनी मुलांना अभ्यास करताना चुका कशा टाळाव्यात यासाठी चुकांची वही (Mistake book) बनवायला सांगितली आहे. या वहित मुलांनी केलेल्या चुका त्यांना लिहाव्यात. अभ्यास करून झाल्यावर त्यांचे ५ ते १० मिनिटे रिवीजन करावी, पाठांतरावर भर न देता गोष्टी समजून मग त्यावर विचार करायला हवा असे सांगितले.

उद्योजक अरविंद नारायणन व सुशिल मुणगेकर यांनी मुलांना उद्योजक होण्यासाठी निरीक्षण,श्रवण,जिज्ञासूवृत्ती, सहानुभुती, निर्मिती, कल्पनाशक्ती या सहा गोष्टी आवश्यक आहे असे सांगत मुलांनी उद्योजक बनण्यासाठी कसा विचार करावा यावर वेगवेगळी उदाहरणे दिली. Spelling Bee या स्पर्धेत जास्तीत जास्त मुलांचा सहभाग कसा घेता येईल यावर रितू मुथा, ज्युड औगस्टीन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.नितीन बच्छाव यांच्यासह सर्व तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जितो अहिंसा रन रविवारी…या ठिकाणी करा नोंदणी

Next Post

कश्यामुळे सध्या महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

manse1
संमिश्र वार्ता

मनसेने राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह तीन जणांची केली पक्षातून हकालपट्टी

ऑगस्ट 25, 2025
निबंधक भागीदारी संस्था संकेतस्थळाचा शुभारंभ 1 2 1024x604 1
संमिश्र वार्ता

भागीदारी संस्था नोंदणीसाठी नवे संकेतस्थळ कार्यान्वित; आधुनिक सुविधा उपलब्ध होणार

ऑगस्ट 25, 2025
IMG 20250825 WA0292 1 e1756121671326
इतर

काठे गल्लीच्या विघ्नहर्ताचे ढोल ताश्यांच्या गजरात वाजत गाजत आगमन

ऑगस्ट 25, 2025
Nitesh Rane
संमिश्र वार्ता

देवेंद्र फडणवीसांच्या आईबद्दल अपशब्द….नितेश राणे यांनी मनोज जरांगेंना दिला हा इशारा….

ऑगस्ट 25, 2025
rape
क्राईम डायरी

अल्पवयीन मुली असुरक्षीत…वेगवेगळ्या दोन घटनेत बलात्कार व विनयभंगाचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 25, 2025
Jitendra Awhad
संमिश्र वार्ता

अंतरिक्षात जाणारा पहिला व्यक्ती हनुमानजी…अनुराग ठाकुर यांचा व्हिडिओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी साधला निशाणा

ऑगस्ट 25, 2025
rohit pawar
संमिश्र वार्ता

रोहित पवार यांनी पुन्हा मंत्री संजय शिरसाटवर केला हा मोठा गंभीर आरोप….दिले १२ हजार पानांचे पुरावे

ऑगस्ट 25, 2025
प्रातिनिधीक फोटो
संमिश्र वार्ता

दहा वेळा पळून गेलेल्या विवाहित महिलेचा १५ दिवस पती व १५ दिवस प्रियकराबरोबर राहण्याचा प्रस्ताव….बघा, नेमकं काय घडलं

ऑगस्ट 25, 2025
Next Post
Untitled 87

कश्यामुळे सध्या महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011