नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अहिंसेचा संदेश तसेच सुंदर नाशिक हरित नाशिकचा संदेश प्रसारित करण्यासाठी, दरवर्षीप्रमाणे यंदाही जीतो द्वारे अहिंसा रनच्या रूपात एक पुढाकार घेण्यात आला आहे. मागील वर्षी या रनला सुरवात झाली होती त्यावेळी ५ हजार स्पर्धक धावले होते.
मागील वर्षी ३ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद झाली असुन यंदा या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. १४ वर्षांवरील सर्वांसाठी ही स्पर्धा खुली आहे. ( जीतो चे ६८ चैप्टर आणि २२ आंतरराष्ट्रीय चैप्टर) यांनी आपापल्या शहरातून रविवार, ३१ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता सदरची अहिंसा रन गोल्फ क्लब येथून सुरु होऊन ३ कि.मि. सिबल होटल, ५ कि.मी. एबीबी सर्कल, १० कि.मी. सातपुर अश्या तिनही स्पर्धा रिटर्न गोल्फ क्लब येथे होणार आहे.
नावनोंदणी ऑनलाइन बंद झाली असून इच्छुक धावपटूनी आपल्या नावाची नोंदणी करण्यासाठी सकाळी १० ते संध्या. ८ वा. पर्यंत जीतो चॅप्टर, बिज़नेस बे, तिड़के कॉलनी येथे समक्ष भेटावे असे आवाहन जीतो नाशिकचे चेयरपर्सन अँड. सुबोध शहा, सौ. कल्पना पटणी, हर्षित पहाडे, संदिप पहाडे, वैशाली जैन, मीता मुथा, मनीषा चोपडा यांनी केले आहे.