बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लाचखोर तहसिलदार, नायब तहसिलदाराला अटक…हे आहे प्रकरण

by India Darpan
मार्च 27, 2024 | 7:47 pm
in स्थानिक बातम्या
0
jail


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुन्हयातील तक्रारदार यांच्याकडुन लाच मागणी करून मागीतलेली लाचेची रक्कम स्विकारण्याच्या अपराधास प्रोत्साहन दिल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने नवापूरचे तहसिलदार महेश कौतिकराव पवार, व निवासी नायब तहसिलदार जितेंद्र जयसिंग पाडवी यांना मंगळवारी अटक करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये घडलेल्या या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तपास पूर्ण झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

या प्रकाराबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार व त्यांच्या गावातील इतर १२ अशा एकुण १३ लोकांविरूध्द विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर विसरवाडी पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी तक्रारदार व इतर १२ अशा एकुण १३ लोकांना प्रतिबंधक कारवाई करणेकामी २ नोव्हेंबर २०२३ रोजी नवापुर तहसिल कार्यालय येथे समक्ष घेऊन गेले होते. त्यावेळी तहसिल कार्यालय, नवापूर येथील खाजगी इसम हनु रामा वळवी यांनी ते स्वतः तहसिल कार्यालय, नवापूर येथे फौजदारी लिपीक असल्याचे भासवून साहेबांकडून तक्रारदार व त्यांच्या सोबतचे इतर १२ जण अशा १३ लोकांविरूध्द दाखल गुन्हयातील प्रतिबंधक कारवाईचे प्रकरण बंद करून देण्यासाठी प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे १३ लोकांचे एकुण १३ हजार रूपयांची प्रथमतः लाचेची मागणी करून, तडजोडीअंती तक्रारदार यांच्याकडुन १० हजार रुपये घेण्याचे मान्य करून लाचेची मागणी केली.

यापैकी ७ हजार रूपये आरोपी खाजगी इसम याने अगोदरच तक्रारदार यांच्याकडुन घेतले असल्याने उर्वरीत ३ हजार रूपयांची लाचेची मागणी केल्याचे ९ नोव्हेंबर २०२३ रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले होते. तसेच मागणी केलेली लाचेची रक्कम ३ हजार रूपये आरोपी खाजगी इसम याने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी १३:३५ ते १३:४३ वाजेचे दरम्यान तहसिल कार्यालय नवापुर येथील महसुल शाखेत पंचांसमक्ष स्विकारलेनंतर लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्याचेविरूध्द् नवापुर पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. ५८४/२०२३ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ (अ) सह भा.दं.वि. कलम १७० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर नमुद गुन्हयाच्या तपासादरम्यान आरोपी लोकसेवक १. महेश कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, २. जितेंद्र जयसिंग पाडवी, निवासी नायब तहसीलदार, नवापुर व ३. अमृत चंद्रसिंग वळवी, महसुल सहाय्यक, (फौजदारी लिपीक) तहसील कार्यालय नवापुर अशा तिन्ही लोकसेवकांनी आरोपी खाजगी इसम हनु रामा वळवी यास गुन्हयातील तक्रारदार यांच्याकडुन लाच मागणी करून मागीतलेली लाचेची रक्कम स्विकारण्याच्या अपराधास प्रोत्साहन दिल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने यातील आरोपी लोकसेवक महेश कौतिकराव पवार, तहसीलदार नवापुर, व जितेंद्र जयसिंग पाडवी, निवासी नायब तहसीलदार, नवापुर यांना दिनांक २६/०३/२०२४ रोजी २२:४८ वाजता गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने अटक करण्यात आलेली आहे.

सदर कामगिरी पोलीस अधिक्षक, श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, अप्पर पोलीस अधिक्षक माधव रेड्डी सोो., ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक, व नरेंद्र पवार, पोलीस उपअधीक्षक (वाचक), ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी व अॅन्टी करप्शन ब्युरो, नंदुरबार पथकाने केली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक मुंबई- आग्रा महामार्गावर कंटेनर पलटी…चालक जखमी

Next Post

या व्यक्तींनी अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नये…जाणून घ्या, गुरुवार, २८ मार्चचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नये…जाणून घ्या, गुरुवार, २८ मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011