इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीने अमरावतील लोकसभा मतदार संघात नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदार संघात महायुतीमधील बच्चु कडू, त्याचबरोबर शिवेसनेचे नेते आनंद अडसूळ यांचा प्रचंड विरोध होता. त्यानंतरही भाजपने या ठिकाणी राणा यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपची ही तिसरी यादी आहे.
ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू हे प्रचंड नाराज झाले आहे. त्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय़ घेतला आहे. आमचा विरोध येथे कायम राहणार आहे. या ठिकाणी प्रहारतर्फे उमेदवार दिला जाणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.
ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी भाजपच्या नेत्यांचे आभार मानले.