नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उदय कॉलनी भागात जुगारीस पोलीसांनी गजाआड केले. तो नागरीकांना पैसे लावून जुगार खेळण्यास भाग पाडत होता. त्याच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंत जयवंत जाधव (रा.मुळेगाव ता.त्र्यंबकेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. उद कॉलनीतील गणेश मंदिर गार्डन भागात एक तरूण नागरीकांना जुगार खेळण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. मंगळवारी (दि.२६) रात्री पोलीसांनी धाव घेतली असता संशयित पोलीसांच्या हाती लागला.
तो कल्याण मिलन नावाचा जुगार खेळत व खेळवितांना मिळून आला. त्याच्या ताब्यातून ६१० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याबाबत अंमलदार अंकुश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक लोणारे करीत आहेत.