इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवेसना ठाकरे गटाने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी ५ नावावर मात्र सस्पेन्स कायम ठेवला आहे. उत्तर मुंबई, जळगाव, कल्याण, हतकंणगले, पालघर ही लोकसभा मतदार संघाची नावे आहेत. या जागेवर ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीत जागा वाटपात ठाकरे गटाला २२ जागा मिळाल्या असून त्यात पाच जागांचे ठाकरे गटाने नावे अद्याप जाहीर केलेले नाही.
उत्तर मुंबईमधून घोसाळकर यांचे नाव चर्चेत आहे. कल्याणमधून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे. त्यामुळे ही नावे अद्याप जाहीर केलेली नाही.
यात कल्याण लोकसभा मतदार संघात ठाकरे कट कोणाला उमेदवारी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. जळगावमध्ये ललिता पाटील बरोबरच विदयमान भाजप खासदार उन्मेश पाटील यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु आहे.