नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पुणे मार्गावरील तुलसी आय हॉस्पिटल भागात पार्क केलेल्या कारमधून २३ लाखाची रोकड लांबविण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या तीन साडे तीन महिन्यापूर्वी ही घटना घडली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन अशोक उबाळे (रा.विरार वसई जि.पालघर) यांनी फिर्याद दिली आहे. उबाळे गेल्या ७ डिसेंबर रोजी शहरात आले होते. प्रॉपर्टीचा व्यवहार करावयाचा असल्याने त्यांनी सुमारे २३ लाखाची रोकड सोबत आणली होती. नाशिक पुणे मार्गावरील तुलसी आय हॉस्पिटल भागात ते कामानिमित्त थांबले असता ही घटना घडली.
नंबर प्लेट नसलेल्या अॅक्टीव्हा दुचाकीवरील अज्ञात भामट्यांनी पार्क केलेल्या कारचा दरवाजा उघडून बॅग चोरून नेली. याबॅगेत २३ लाखाची रोकड होती. अधिक तपास जमादार रोहिदास सोनार करीत आहेत.