मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखेर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीने राज्यातील लोकसभेच्या आठ जागेवर उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीने वंचितला सहा जागांची ऑफर दिली होती. पण, वंचितने आपला वेगळा मार्ग निवडत ही उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
महाविकास आघाडीबरोबर काडीमोड घेतल्यानंतर वंचित तिसरी आघाडी म्हणून लोकसभेच्या लढवणार जागा आहे. मागील लोकसभेची पुनरावृत्ती करत ही निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे त्याचा फटका आता कोणाला कस बसतो हे बघणे औत्सुक्याचे असणार आहे.
लोकसभा मतदार संघ उमेदवारांची नावे
भंडारा-गोंदिया – संजय केवट
गडचिरोली-चिमूर- हितेश मडावी
चंद्रपूर – राजेश बेले
बुलडाणा – वसंत मगर
अकोला – प्रकाश आंबेडकर
अमरावती – कु. प्राजक्ता पिल्लेवान
वर्धा – प्राध्यापक राजेंद्र साळुंके
यवतमाळ-वाशिम – खेमसिंग पवार