इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लखनऊः भाजपने वरुण गांधी यांना उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसचे दोन वेळचे माजी खासदार व आता योगी मंत्रिमंडळात असलेल्या जितीन प्रसाद यांना उमेदवारी दिली आहे. पिलीभीत मतदारसंघातून वरुण यांना उमेदवारी भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर आता काँग्रेसने ऑफर दिली आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असे म्हटले आहे. ते काँग्रेसमध्ये येत असतील तर आम्हाला आनंद होईल.
वरुण गांधी यांना भाजपने तिकीट न मिळाल्याने ते बंडखोरीची करेल असे बोलले जात आहे. या मतदारसंघात आधी मेनका गांधी यांचे वर्चस्व होते. २०१९ मध्ये वरुण गांधी या जागेवरून निवडून आले होते. त्याअगोदर ते सुल्तानपूरचे खासदार होते. जितीन प्रसाद हे २००४ मध्ये शाहजहापूर, २००९ मध्ये धौरहराचे खासदार होते. ते केंद्रात दोनदा मंत्री होते. २०२१ मध्ये ते भाजपत आले.
आता या मतदार संघात वरुण गांधी यांना उमेदवारी न दिल्यामुळे ते काय निर्णय़ घेतात हे महत्त्वाचे आहे. ते काँग्रेसमध्ये जातात की अपक्ष उमेदवारी करतात हे अद्याप समोर आलेले नाही.